Posts

Showing posts from August, 2020

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अद्याप निर्णय नाही..- न्यायालयाने 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला आहे निकाल..

Image
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अद्याप निर्णय नाही. . - न्यायालयाने 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला आहे  निकाल.. अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा तिढा अद्याप संपला नाही. विद्यापीठाला यूजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग)च्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भातील निर्देशांविरोधात याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला. आगामी तीन दिवसात सर्व याचिकाकर्त्यांना आपले म्हणणे लेखी स्वरूपात सर्वोच्च न्यायालयात मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्रात सरकारची नकारात्मक भूमिका असतानाही यूजीसीने परीक्षा घेण्याचे आदेश दिले. मात्र राज्य सरकार परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होती. मात्र याबाबत निकाल लागला नाही. महाराष्ट्र सरकारतर्फे वकील अरविंद दातार यांनी युक्तिवाद केला. विद्यार्थी विरुद्ध यूजीसी प्रकरणात ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांनी सरकारची बाजू मांडली. आता महाराष्ट्र फक्त अंतिम परीक्षेसंबंधित वाद आहे. जर ...

कृष्णा- कोयना... सख्या बहिणी.....

Image
कृष्णा- कोयना... सख्या बहिणी. कराडचा प्रितीसंगम म्हणजे निसर्गाची एक कलाकृतीच आहे. उत्तरेहुन वाहत येणारी कृष्णा व दक्षिणेहुन येणारी कोयना दोघी अगदी आमने सामने येवून एकमेकिँना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पुर्वेला वाहत जातात. असे काटकोनात वाहने सहसा नद्यांच्या स्वभावात नाही. पण कराडचा प्रितीसंगम मात्र त्याला अपवाद. तसे म्हंटले तर कृष्णा व कोयना सख्या बहिणीच... महाबळेश्वर हे या दोघीँचे उगमस्थान. पण दोघींमध्ये केवढा फरक, थोरली बहिण कृष्णा समसूतदारपणे वगणारी. ही लहान मुलीसारखी डोँगर- दर्याँमध्ये जास्त खेळत बसत नाही. हिला घाई असते ती घाटांवर यायची, तहानलेल्या पिकांना पाणि पाजून ताजे तवाने करण्याची. तर धाकटी बहीण कोयना म्हणजे खुप खोडकर... डोँगरांमध्ये खेळणे हिला फार आवडते. हिचे सगळे मित्र पण असेच रांगडे... प्रतापगड, मकरंदगड, वासोटा आणि जावळीचे खोरे म्हणजे यांचे आंगण, पण धाकटी असली तरी आंगात जोर फार... पूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवते. तर अश्या या दोघी. अगदी भिन्न स्वभावाच्या पण सख्या बहिणी. जबाबदारीने वागणारी कृष्णा तर खोडकर कोयना. उस शेती पिकवणारी कृष्णा, तर भात पिकव...

महाराष्ट्र राज्यात आजी-माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करातून माफी,ग्रामविकास विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

Image
आजी-माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करातून माफी,ग्रामविकास विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय . राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागामार्फत निर्गमित करण्यात आला असून देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राज्यातील सर्व आजी-माजी सैनिकांसाठी हा निर्णय लागू करण्यात येत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. ग्रामीण क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या अनेक आजी, माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून निःस्वार्थपणे देशाचे संरक्षण केले आहे. त्यांची देशसेवा विचारात घेता सर्व आजी, माजी सैनिकांना भावनिक दिलासा देणे व त्यांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्याच्या अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतला असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. अशा करमाफीस पात्र ठरणाच्या व्यक्तींनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

सलमानला मारण्यासाठी शार्प शूटर आला होता मुंबईत; पोलिसांनी केली अटक

Image
सलमानला मारण्यासाठी शार्प शूटर आला होता मुंबईत; पोलिसांनी केली अटक .. 👉अभिनेता सलमान खानच्या हत्येसाठी रेकी करणाऱ्या गुन्हेगाराला क्राइम ब्रांचने अटक केली आहे. या गुन्हेगाराचं नाव राहुल असून क्राइम ब्रांचने १५ ऑगस्ट रोजी उत्तराखंडमध्ये त्याला अटक केली. अटक केल्यानंतर चौकशीत राहुलने अनेक आरोपांचे खुलासे केले. 👉आरोपी राहुल उर्फ सांगा याने जानेवारी महिन्यात मुंबईत येऊन सलमानच्या घराची रेकी केली होती, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. सलमान घरातून किती वाजता बाहेर पडतो, त्याची दिनचर्या कशी असते याबाबत त्याने माहिती मिळवली होती. कुख्यात लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची जबाबदारी राहुलला दिली होती.  👉लॉरेन्स बिश्नोई हा हरयाणा, पंजाब आणि राजस्थानचा कुख्यात गँगस्टर असून त्यानेच सलमानच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.राहुल हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचा शार्प शूटर आहे. लॉरेन्सच्या सांगण्यावरून त्याने सलमानची रेकी केली होती आणि त्यापुढील योजना आखली होती. लॉरेन्स बिश्नोई सध्या जोधपूरच्या कारागृहात आहे. तर राहुलवर अनेक हत्यांच...

स्वतःला आत्मनिर्भर, कणखर आणि शक्तिशाली बनवायचं असेल तर...

Image
स्वतःला आत्मनिर्भर, कणखर आणि शक्तिशाली बनवायचं असेल तर  अभ्यासाबरोबरच महत्वकांक्षा, परिश्रम आणि प्रयत्न आवश्यक आहेत......हे लिहिण्याचं कारण म्हणजे छायाचित्रातील ही स्वप्नाली सुतार.कणकवली तालुक्यातील दुर्गम अशा दारीस्ते गावातील ही युवती. अभ्यासात भयंकर हुशार....दहावीत 98 टक्के तर बारावीत कॉलेज मध्ये प्रथम आलेली.डॉक्टर व्हायची इच्छा.... पण परिस्थिती आडवी आली.आई वडील शेतकरी,एवढा खर्च पेलवणारा नव्हता.म्हणून मुंबईला पशु वैद्यकीय अधिकारी होण्याचं शिक्षण घेत होती.लॉकडाऊन मध्ये गावात अडकली.... आणि तिकडे ऑनलाइन लेक्चर सुरू झाले.गावातील घराकडे फोन येण्याचं नेटवर्क मिळताना मारामारी तिथे इंटरनेट कुठून असणार..?परत अँड्रॉइड मोबाईलचा ही प्रश्न होताच.मोठ्या भावाने आपला मोबाईल दिला.....त्याचा मोबाईल घेऊन कुठे नेट मिळते यासाठी फिरत असताना डोंगरात नेट मिळालं.उन्हाळयात दिवसभर डोंगरावर झाडाखाली उभं राहून शिक्षण घेत होती.सकाळी 7 ला घरातून जाते ती सायंकाळी 7 च्या आसपास येते.अख्खा दिवस डोंगरातील त्या झोपडीतच जातो.....पुन्हा प्रॉब्लेम आला तो चार्जिंगचा.कुठल्यातरी मॅडमनी पॉवर बँक दिली.पावसाळा सु...

निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा.

Image
निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. लवासा पुढील महिन्यात फिलिपाईन्सस्थित एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (एडीबी) उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. लवासा हे 1980 च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी होते. मुख्य निवडणूक आयुक्त होण्याचे ते दावेदार होते. त्यांचा निवडणूक आयोगाचा कार्यकाळ अद्याप बाकी होता. 23 जानेवारी 2018 रोजी त्यांनी भारताच्या निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. ऑक्टोबर 2022 मध्ये ते मुख्य निवडणूक आयुक्तपदावरून सेवानिवृत्त होणार होते. मात्र, आता ते एडीबीचे उपाध्यक्षपद भूषवतील.  एशियन डेव्हलपमेंट बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, एडीबीने अशोक लवासा यांची खासगी क्षेत्रातील कामकाजासाठी आणि सार्वजनिक खासगी भागीदारीसाठी बँकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. दिवाकर गुप्ता यांची जागा ते घेतील. गुप्ता यांचा कार्यकाळ 31 ऑगस्टपर्यंत आहे.  निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होण्यापूर्वी लवासा केंद्रीय अर्थ सचिव म्हणून निवृत्त झाले. यापूर्वी ते पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे केंद्रीय सचिवही ह...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह ..

Image
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. शरद पवार यांची मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तपासणी केली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शरद पवार सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत. पवारांचा स्टाफ ज्या ठिकाणी राहतो, तिथेही चाचणी करत आहोत. त्यांची काळजी घेतली जात आहे. प्रोटोकॉलनुसार सगळ्या गोष्टी पाळल्या जात आहेत, असं राजेश टोपे म्हणाले. शरद पवार सातत्याने राज्यभर दौरा करत आहेत. मात्र सध्या राज्यात न फिरण्याची विनंती करणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, “शरद पवार महाराष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. काळजी घ्यावी असं आम्ही कायमच सांगत असतो. परंतु त्यांचा उत्साह, लोकांप्रति बांधिलकी किंवा दौऱ्यातून कदाचित संदेश द्यायचे असतात. ते स्वत:ही काळजी घेत आहेत, चिंता करण्याची काही गोष्ट नाही,” असं राजेश टोपे म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा AIIMSमध्ये केलं दाखल.

Image
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा AIIMS मध्ये केलं दाखल -----------------------------------  नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना AIIMSमध्ये दाखल करण्यात आलं आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याचे अमित शाह यांना रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे. याआधी अमित शाह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, त्यानंतर उपचारानंतर दुसऱ्यांदा चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून अमित शाह होम आयसोलेशनमध्ये होते. अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात 14 ऑगस्ट रोजी कोरोनामुक्त झाल्याचे स्वतः ट्वीट करून सांगितले होते. शाह यांनी ट्वीट करून आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. मात्र आता पुन्हा त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हालशुगर च्या अध्यक्षांना कोरोनाची बाधा, तर सोमवारी निपाणी शहरातील पंतनगर येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू.

Image
हालशुगर च्या अध्यक्षांना कोरोनाची बाधा, तर सोमवारी निपाणी शहरातील पंतनगर येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू... निपाणी-: निपाणी शहरात कोरोनाचा विळखा घट्टच बनत जात आहे. निपाणी शहाराबरोबर आता ग्रामीण भागात ही आता कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षाना कोरोनाची लागण झालेली आहे.तर त्यांच्या कुटुंबातील चौघांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे .      सोमावरी उपचार दरम्यान निपाणी शहरातील पंत नगर येथील 65 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सोमवारच्या बुलेटिन नुसार निपाणी शहर पोलीस स्थानकातील एका कर्मचाऱ्याला ही कोरोनाची लागन झालेली आहे. निपाणी तालुक्यातील कोरोना बाधित रुगणांची संख्या वाढत जात असताना कोरोना मुक्त होणाऱ्याची संख्या ही अधिक आहे .

निपाणी तालुक्यात आज सोमवारी 29 नवे कोरोनाचे रुग्ण..निपाणी शहरात 7 रुग्ण तर ग्रामीण भागात 22 कोरोनाचे रुग्ण.

Image
निपाणी तालुक्यात आज सोमवारी 29 नवे कोरोनाचे रुग्ण.. निपाणी शहरात 7 रुग्ण तर ग्रामीण भागात 22 कोरोनाचे रुग्ण. निपाणी तालुक्यात कोरोनाचा विस्तार झपाट्याने होत चाललेला आहे .आज सोमवारी पुन्हा निपाणी तालुक्यात 29 नव्या रुगणांची भर पडलेली आहे. निपाणी।तालुक्यातील आजचे रुग्ण-: निपाणी शहर- : बड्डे गल्ली-1  साखरवाडी-1 शिंत्रे कॉलनी-1 आंदोलन नगर- 1 आझाद गली-1 इतर-2 ग्रामीण भागात-: अप्पाचीवाडी- 4 कुर्ली- 2 भोज- 8 यमगरणी-2  बुदिहाळ-1 ममदापुर- 1 बेनाडी-1 भिवशी-1 अकोळ-2

सार्वजनिक गणेश मंडळांनी नियम पाळून गणेशोत्सव साजरा करावा. निपाणी बसवेश्वर पोलीस स्थानकडून गावोगावी जागृती..

Image
यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना सरकारने नियम घालून गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. बसवेश्वर पोलीस स्थानकाकडून  गावोगावो यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियमांचे पालन व्हावे यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.यंदाच्या गणेशोत्सवासाठी सरकारने मंडप घालण्यावर सरकारने बंदी घातलेली आहे.त्यामुळे मूर्तीची स्थापना गावातील देवळात अथवा घरी बसवाव्या अशा सुचना करण्यात आल्या आहेत.आरतीसाठी 10 पेक्षा जास्त लोक असू नयेत ,महाप्रसाद करण्यास मनाई आहे ,गणपती येताना किव्हा जाताना कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढू नये अशा सूचना पोलिसांच्या कडून देण्यात येत आहेत. श्रीपेवाडी येथे पोलिसांच्या कडून जनजागृती-: श्रीपेवाडी येथील सार्वजनिक गणेश मंडळांना बसवेश्वर पोलीस स्थानकाकडून सरकार कडून घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन एएसआय आर जी कुंभार यांनी केले. यावेळी बिट पोलीस यांनी रामगोंडा पाटील यांनी गावातील सर्व गणेश मंडळांना सूचना करून गणेशोत्सव साजरा करावा अशी विनंती केली.यावेळी अचानक तरुण  मंडळ, बसवेश्व...

राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर कायम काळम्मावाडी धरणातून १२९५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु.

Image
राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर कायम काळम्मावाडी धरणातून १२९५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु.. दूधगंगेच पाणी पात्राबाहेर राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्यामुळे काळम्मावाडी (दूधगंगानगर) येथील राजर्षी शाहू  धरण ९३.०६टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून १११५० कुसेक तर जलविद्युत केंद्रातून १८०० कुसेक असा एकुण १२९५० कुसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. आज धरणात ९३.०६ टक्के म्हणजेच (२३.६३ ) टी. एम. सी. इतका पाणी साठा झाला आहे. पावसाचा जोर लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग ७६५० क्युसेसने वाढवला असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.   आज काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात १०३ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून आज अखेर धरण क्षेत्रात २९३८ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे .यामुळे आजची धरणाची पाणी पातळी ६४४.३१ मिटर तर पाणीसाठा ६६९ मी. म्हणजेच ९३.०६ टक्के (२३.६३ टी.एम.सी.) इतका झाला आहे .

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कणगला येथे भीषण अपघात, अपघातात एकाचा मृत्यू.

Image
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हुक्केरी तालुक्यातील कनगला येथे कंटेनर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मृत व्यक्तीच्या आसपास कोणतेही ओळख पटनेसारख्या गोष्टी न मिळाल्यामुळे मृत व्यक्ती कोणत्या ठिकाणची आहे हे समजू शकले नाही आहे. संकेश्वर पोलीस स्थानकाचे  पीएसआय गणपती कोंगनोळी याची घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.अपघाताची नोंद संकेश्वर पोलीस स्थानकात झालेली आहे...

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस,कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ..‘अलमट्टी’ तून अडीच लाख क्यूसेक विसर्ग

Image
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ.. ‘अलमट्टी’ तून अडीच लाख क्यूसेक विसर्ग August 17, 202004 धरण क्षेत्रासह जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यास सांगितले. त्यानुसार सोमवारी अडीच लाख विसर्ग सुरू ठेवण्यात आला. दरवर्षीचा अनुभव पाहता शिरोळ तालुक्यातील अनेक गावे पुराच्या वेढ्यात सापडतात. यावेळीही संततधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे दक्षता घेत मंत्री यड्रावकार यांनी बेळगावचे पालकमंत्री जारकीहोळी यांच्याशी चर्चा करून अलमट्टीतून विसर्ग वाढविण्याची विनंती केली. त्यानुसार दोन लाख क्यूसेक वरून अडीच लाख क्यूसेक विसर्ग वाढविण्यात आला. दरम्यान, मंत्री यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी, तेरवाड बंधारा, राजापूर बंधारा येथे भेट देऊन पुरस्थितीची पाहणी केली. राजापूर बंधारा येथून एक लाख २७ हजार ५...

तवंदी येथील प्राथमिक सरकारी शाळेला माजी विद्यार्थी हरिष पाटील यांची 50 हजारांची देणगी.देणगी मधून बसविले शाळेवर पत्रे..

Image
तवंदी येथील प्राथमिक सरकारी शाळेला माजी विद्यार्थी हरिष पाटील यांची 50 हजारांची देणगी. देणगी मधून बसविले शाळेवर पत्रे.. तवंदी येथील मराठी मुलांची प्राथमिक शाळेला माजी विध्यार्थी असलेले अभियंते हरिष पाटील यांनी 50 हजार रुपायांची मदत दिली होती.            शााळेवर बसविण्यात आलेेलेे पत्रे.. हरिष पाटील यांनी दिलेल्या देणगी मधून गावकरी व शाळेतील शिक्षकांनी शाळेवर पत्रे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार शाळेवर पत्रे बसविण्यात आले आहेत .. मुख्याध्यापिका ए एच शिडलाळे यांनी त्यांचे आभार मानले अशा दानशुर व्यक्तीच्या मुळे आज अनेक ठिकाणी शाळा सुधारणेत वाढ होत आहे यावेळी ग्राम पंचायत सदस्त संजय पाटील,अशोक पाटील,राजेंद्र गुरव, एसडीएमसी अध्यक्ष दत्तात्रय पाटील, जालंधर पाटील,दिवाकर पाटील, रघुनाथ पाटील,शिवाजी जाधव,रवींद्र मोहिते,शमबाला पाटील,कृष्णात कमटे क यांच्यासह गावकरी सहभागी होते

कोरोना आला आणि माणसातली माणुसकी हरवली..माणुसकी आता राहिली कुठे ?.....मृत्यू नंतर ही मृतदेह वाट पाहत राहिला व्हेंटिलेटर वर असणाऱ्या आरोग्य विभाग व प्रशासनाची ..

Image
कोरोना आला आणि माणसातली माणुसकी हरवली..माणुसकी आता राहिली कुठे ?..... मृत्यू नंतर ही मृतदेह वाट पाहत राहिला व्हेंटिलेटर वर असणाऱ्या आरोग्य विभाग व प्रशासनाची .. गावकऱ्यांनी लावली दारे,बापाचा मृतदेह नेला सायकल वरून.....  गावकऱ्यांनी अंत्यसंस्कारास येण्यास नकार दिल्यानंतर मुलांनी त्यांच्या बापाचा मृतदेह सायकलवर स्मशानभूमीत नेला.माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील एमके हुबळी गावात.  70 वर्षीय व्यक्तीचा आजारपणामुळे शनिवारी मृत्यू झाला.संबंधित व्यक्ती चा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला ,उपचारासाठी त्या व्यक्तीला रुग्णालयात घेवुन जाण्याअगोदरच त्या व्यक्तीचा घरी मृत्यू झाला. कुटुंबियांनी तहासिलदार व प्रशासन यांच्याकडे याची माहिती दिली पण व्हेंटिलेटर वर असणाऱ्या प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्या व्यक्तीच्या निधनानंतर गावकऱ्यानी कोरोनाच्या भितीने व अफवेमुळे अंत्यसंस्कारास येण्यास नकार दिला. अगदी नातेवाईकांनीही अंत्ययात्रेत भाग घेण्यास नकार दिला. शेवटी त्याच्या मुलांनी मृतदेह सायकलवर नेत बापावर अंतिम संस्कार केले. यावेळी घरच्यांच्या...

निपाणी तालुक्यात आज 21 जणांना कोरोनाची लागन.निपाणी शहरात 19 तर ग्रामीण भागात दोन रुग्ण..

Image
.निपाणी तालुक्यात आज 21 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत यामदे 19 जण हे शहरातील असून 2 जण हे ग्रामीण भागातील आहे . तर बेळगाव जिल्ह्यात (16 ऑगस्ट) आरोग्य विभागाच्या मीडिया बुलेटिनमध्ये 478 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे निपाणी शहरात कोरोनाच्या रुगणांची संख्या ही रोजच वाढतच चालली आहे , त्यामुळे निपाणी शहरात भीतीचे वातावरन पसरत आहेत, सराफी व्यापारी व किराणा दुकान यांनी आज रविवार पासून चार दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतेलेला आहे . निपाणी शहरातील आजचे रुग्ण. शिंत्रे कॉलनी - 4 रोहिणी नगर -3 निपाणी शहर-3  साखरवाडी -1 कागवाडे प्लॉट-1  बड्डे गल्ली-1 शिवाजी चौक-1 गांधी चौक-1 आमटे गल्ली -3 प्रतिभा नगर-1 भोज-1 भिमापूरवाडी-1 निपाणी तालुका -21

निपाणी तालुक्यात जोरदार पाऊस,वेदगंगा, दुधगंगा नदीचे पाणी पुन्हा पात्रा बाहेर......

Image
वेदगंगा, दुधगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर......           जत्राट- भिवशी बंधारा पाण्याखाली निपाणी तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेले दोन दिवस संततधार कोसळत असलेल्या  पावसामुळे , निपाणी तालुक्यातून वाहणाऱ्या वेदगंगा व दुधगंगा नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे.  तालुक्यातील  काही ठिकाणी  नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे.  या भागातील शेतकर्यांनी लावलेल्या ऊस पिकाची जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या शेतकऱयांना पुन्हा नुकसान सहन करावे लागणार आहे.   निपाणी तालुक्यातील सर्व बंधारे जत्राट ,सिदनाळ,भोज-कारदगा , कुनुर-बारवाड पाण्याखाली आलेले आहेत.या सर्व बंधार्यावरून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे ,प्रशासनाणे नदी काठच्या गावांना सावध राहण्याचा इशारा दिलेला आहे..

निपाणी मराठा मंडळ हायस्कुल मार्फत स्वातंत्र्यदिनी दहावी परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विध्यार्थ्याचा सत्कार..

Image
स्वातंत्र्यदिनी निपाणी मराठा मंडळ संचलित श्रीमती हौशाबाई विठ्ठलराव कदम ,मराठी विध्यानिकेतन, बालवाडी, निपाणी मराठा मंडळ हायस्कूल निपाणी, मराठा मंडळ आय टी आय ह्यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण समिती चेअरमन श्री राजेश रघुनाथराव कदम ह्यांच्या हस्ते व निपाणीचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, माजी नगरसेवक विश्वास पाटील सामाजिक कार्यकर्ते बबन चौगुले प्रमुख मान्यवरच्या उपस्थितीत 74 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.  ह्यावेळी सण 2019/20 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षा मध्ये निपाणी मराठा मंडळ हायस्कूल निपाणी मध्ये प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल कुमार प्रथमेश संजय हजारे 96.96%ह्यांचाचेअरमन श्री राजेश रघुनाथराव कदम ह्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला  द्वितीय क्रमांक कुमारी किरण विजय पाटील 86.72% हिचा मा चंद्रकांत जासूद यांच्या हस्ते तर तृतीय क्रमांक कुमारी रोहिणी विनायक रानमाळे 86.56% हिचा  मा विश्वास पाटील यांच्या हस्ते व चौथा क्रमांक कुमारी श्वेता रवींद्र शिंदे 84.48% हिचा मा.बबन चौगुले ह्यांचा हस्ते  सपन्न झाला तसेच विश्वजि...

कोयनेतून पाण्याचा विसर्ग सुरू. कृष्णा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा...

Image
सातारा जिल्ह्यात मुसळधार होत असलेल्या पावसामुळे कोयनेच्या पाणी पात्रात वाढ झालेली आहे त्यामुळे.  कोयना  धरणातून आज सकाळी 8.30 वाजले पासून  25604 क्युसेकस् पाण्याचा विसर्ग चालू करण्यात आला होता. त्यात वाढ करून आज सकाळी 11.00 वाजले पासून कोयना धरणातून एकूण 35000 क्युसेकस् पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यानंतर आता दुपारी 2.00 वाजता एकूण विसर्ग 40000 क्युसेकस् करण्यात आला आहे. कोयना व कृष्णा नदीकाठच्या  गावांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, कोल्हापूर जिल्ह्यात ही काल पासून पावसाचा जोर वाढल्यामुळे पुन्हा नदी पात्रात पण्याची वाढ झालेली आहे, यामुळे सांगली ,कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा पुराचा धोका निर्माण झालेला आहे. सांगलीत कृष्णा नदी सोमवारी सर्वसाधारण पूर पातळी गाठण्याची शक्यता आहे. कोयना धरणातून पंचवीस हजार क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने सोमवारी पाणीपातळी 35 फुटांच्या आसपास जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने सांगलीत नदी काठच्या भागात दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कृष्णा नदी काठी असलेल्या श्री क्षेत्र औदुंबर मधील द...