कोरोना आला आणि माणसातली माणुसकी हरवली..माणुसकी आता राहिली कुठे ?.....मृत्यू नंतर ही मृतदेह वाट पाहत राहिला व्हेंटिलेटर वर असणाऱ्या आरोग्य विभाग व प्रशासनाची ..
कोरोना आला आणि माणसातली माणुसकी हरवली..माणुसकी आता राहिली कुठे ?.....
मृत्यू नंतर ही मृतदेह वाट पाहत राहिला व्हेंटिलेटर वर असणाऱ्या आरोग्य विभाग व प्रशासनाची ..
गावकऱ्यांनी लावली दारे,बापाचा मृतदेह नेला सायकल वरून.....
गावकऱ्यांनी अंत्यसंस्कारास येण्यास नकार दिल्यानंतर मुलांनी त्यांच्या बापाचा मृतदेह सायकलवर स्मशानभूमीत नेला.माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील एमके हुबळी गावात.
70 वर्षीय व्यक्तीचा आजारपणामुळे शनिवारी मृत्यू झाला.संबंधित व्यक्ती चा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला ,उपचारासाठी त्या व्यक्तीला रुग्णालयात घेवुन जाण्याअगोदरच त्या व्यक्तीचा घरी मृत्यू झाला. कुटुंबियांनी तहासिलदार व प्रशासन यांच्याकडे याची माहिती दिली पण व्हेंटिलेटर वर असणाऱ्या प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्या व्यक्तीच्या निधनानंतर गावकऱ्यानी कोरोनाच्या भितीने व अफवेमुळे अंत्यसंस्कारास येण्यास नकार दिला. अगदी नातेवाईकांनीही अंत्ययात्रेत भाग घेण्यास नकार दिला. शेवटी त्याच्या मुलांनी मृतदेह सायकलवर नेत बापावर अंतिम संस्कार केले. यावेळी घरच्यांच्या तीन व्यतिरिक्त स्मशानभूमीत कोणीही उपस्थित नव्हते. सायकल वरून मृतदेह घेऊन जात आहे अशी बातमी पसरताच तालुका प्रशासनाने रुग्णवाहिका उपलब्द करून दिली. दरम्यान यापूर्वी, अथणी तालुक्यात रुग्णवाहिकेच्या अभावामुळे एका महिलेने 5 किलोमीटरपर्यंत आपल्या पतीचा मृतदेह हातगाडीवरून नेला होता.
बेळगाव जिल्ह्यात चार मंत्री असूनही रुग्णाचे हाल होत असल्यामुळे सर्वत्र नाराजगी बोलून दाखवली जात आहे. आरोग्य विभाग व प्रशासनावर शासनाचा वचक न राहिल्यामुळे अशा गोष्टी घडत असल्याचे दिसून येत आहे.
Comments
Post a Comment