महाराष्ट्र राज्यात आजी-माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करातून माफी,ग्रामविकास विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

आजी-माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करातून माफी,ग्रामविकास विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागामार्फत निर्गमित करण्यात आला असून देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राज्यातील सर्व आजी-माजी सैनिकांसाठी हा निर्णय लागू करण्यात येत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

ग्रामीण क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या अनेक आजी, माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून निःस्वार्थपणे देशाचे संरक्षण केले आहे. त्यांची देशसेवा विचारात घेता सर्व आजी, माजी सैनिकांना भावनिक दिलासा देणे व त्यांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्याच्या अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतला असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. अशा करमाफीस पात्र ठरणाच्या व्यक्तींनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

Lockdown | देशभरात अडकलेल्या लोकांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा; गृह मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी

Coronaupdate | कोरोना महामारीचा सर्वात जास्त धोका हा ज्येष्ठ नागरिकांना आहे. या काळात ज्येष्ठांनी 'काय करावं आणि काय करु नये' यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचं गंभीरपणे पालन होणं आवश्यक आहे. #coronavirus

निपाणी तालुक्यात आज 21 जणांना कोरोनाची लागन.निपाणी शहरात 19 तर ग्रामीण भागात दोन रुग्ण..