राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर कायम काळम्मावाडी धरणातून १२९५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु.
राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर कायम काळम्मावाडी धरणातून १२९५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु..
दूधगंगेच पाणी पात्राबाहेर
राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्यामुळे काळम्मावाडी (दूधगंगानगर) येथील राजर्षी शाहू धरण ९३.०६टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून १११५० कुसेक तर जलविद्युत केंद्रातून १८०० कुसेक असा एकुण १२९५० कुसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. आज धरणात ९३.०६ टक्के म्हणजेच (२३.६३ ) टी. एम. सी. इतका पाणी साठा झाला आहे. पावसाचा जोर लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग ७६५० क्युसेसने वाढवला असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आज काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात १०३ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून आज अखेर धरण क्षेत्रात २९३८ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे .यामुळे आजची धरणाची पाणी पातळी ६४४.३१ मिटर तर पाणीसाठा ६६९ मी. म्हणजेच ९३.०६ टक्के (२३.६३ टी.एम.सी.) इतका झाला आहे .
Comments
Post a Comment