केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा AIIMSमध्ये केलं दाखल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा AIIMS मध्ये केलं दाखल
----------------------------------- 
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना AIIMSमध्ये दाखल करण्यात आलं आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याचे अमित शाह यांना रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे. याआधी अमित शाह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, त्यानंतर उपचारानंतर दुसऱ्यांदा चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून अमित शाह होम आयसोलेशनमध्ये होते.

अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात 14 ऑगस्ट रोजी कोरोनामुक्त झाल्याचे स्वतः ट्वीट करून सांगितले होते. शाह यांनी ट्वीट करून आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. मात्र आता पुन्हा त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Comments

Popular posts from this blog

Lockdown | देशभरात अडकलेल्या लोकांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा; गृह मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी

Coronaupdate | कोरोना महामारीचा सर्वात जास्त धोका हा ज्येष्ठ नागरिकांना आहे. या काळात ज्येष्ठांनी 'काय करावं आणि काय करु नये' यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचं गंभीरपणे पालन होणं आवश्यक आहे. #coronavirus

निपाणी तालुक्यात आज 21 जणांना कोरोनाची लागन.निपाणी शहरात 19 तर ग्रामीण भागात दोन रुग्ण..