कोयनेतून पाण्याचा विसर्ग सुरू. कृष्णा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा...
सातारा जिल्ह्यात मुसळधार होत असलेल्या पावसामुळे कोयनेच्या पाणी पात्रात वाढ झालेली आहे त्यामुळे.
कोयना धरणातून आज सकाळी 8.30 वाजले पासून 25604 क्युसेकस् पाण्याचा विसर्ग चालू करण्यात आला होता.
त्यात वाढ करून आज सकाळी 11.00 वाजले पासून कोयना धरणातून एकूण 35000 क्युसेकस् पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
त्यानंतर आता दुपारी 2.00 वाजता एकूण विसर्ग 40000 क्युसेकस् करण्यात आला आहे.
कोयना व कृष्णा नदीकाठच्या गावांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, कोल्हापूर जिल्ह्यात ही काल पासून पावसाचा जोर वाढल्यामुळे पुन्हा नदी पात्रात पण्याची वाढ झालेली आहे, यामुळे सांगली ,कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा पुराचा धोका निर्माण झालेला आहे.
सांगलीत कृष्णा नदी सोमवारी सर्वसाधारण पूर पातळी गाठण्याची शक्यता आहे. कोयना धरणातून पंचवीस हजार क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने सोमवारी पाणीपातळी 35 फुटांच्या आसपास जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने सांगलीत नदी काठच्या भागात दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कृष्णा नदी काठी असलेल्या श्री क्षेत्र औदुंबर मधील दत्त मंदीरात पाणी शिरले असून जसजशी पाणी पातळी वाढेल तसे मंदीर पाण्याखाली जाण्यास सुरुवात होणार आहे.
Comments
Post a Comment