सार्वजनिक गणेश मंडळांनी नियम पाळून गणेशोत्सव साजरा करावा. निपाणी बसवेश्वर पोलीस स्थानकडून गावोगावी जागृती..
यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना सरकारने नियम घालून गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे.
बसवेश्वर पोलीस स्थानकाकडून गावोगावो यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियमांचे पालन व्हावे यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.यंदाच्या गणेशोत्सवासाठी सरकारने मंडप घालण्यावर सरकारने बंदी घातलेली आहे.त्यामुळे मूर्तीची स्थापना गावातील देवळात अथवा घरी बसवाव्या अशा सुचना करण्यात आल्या आहेत.आरतीसाठी 10 पेक्षा जास्त लोक असू नयेत ,महाप्रसाद करण्यास मनाई आहे ,गणपती येताना किव्हा जाताना कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढू नये अशा सूचना पोलिसांच्या कडून देण्यात येत आहेत.
श्रीपेवाडी येथे पोलिसांच्या कडून जनजागृती-:
श्रीपेवाडी येथील सार्वजनिक गणेश मंडळांना बसवेश्वर पोलीस स्थानकाकडून सरकार कडून घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन एएसआय आर जी कुंभार यांनी केले. यावेळी बिट पोलीस यांनी रामगोंडा पाटील यांनी गावातील सर्व गणेश मंडळांना सूचना करून गणेशोत्सव साजरा करावा अशी विनंती केली.यावेळी अचानक तरुण मंडळ, बसवेश्वर तरुन मंडळ, सिंह गर्जना, नृसिंह तरुण मंडळ, सिद्धिविनायक तरुण मंडळ यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment