सलमानला मारण्यासाठी शार्प शूटर आला होता मुंबईत; पोलिसांनी केली अटक

सलमानला मारण्यासाठी शार्प शूटर आला होता मुंबईत; पोलिसांनी केली अटक..

👉अभिनेता सलमान खानच्या हत्येसाठी रेकी करणाऱ्या गुन्हेगाराला क्राइम ब्रांचने अटक केली आहे. या गुन्हेगाराचं नाव राहुल असून क्राइम ब्रांचने १५ ऑगस्ट रोजी उत्तराखंडमध्ये त्याला अटक केली. अटक केल्यानंतर चौकशीत राहुलने अनेक आरोपांचे खुलासे केले.

👉आरोपी राहुल उर्फ सांगा याने जानेवारी महिन्यात मुंबईत येऊन सलमानच्या घराची रेकी केली होती, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. सलमान घरातून किती वाजता बाहेर पडतो, त्याची दिनचर्या कशी असते याबाबत त्याने माहिती मिळवली होती. कुख्यात लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची जबाबदारी राहुलला दिली होती. 

👉लॉरेन्स बिश्नोई हा हरयाणा, पंजाब आणि राजस्थानचा कुख्यात गँगस्टर असून त्यानेच सलमानच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.राहुल हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचा शार्प शूटर आहे. लॉरेन्सच्या सांगण्यावरून त्याने सलमानची रेकी केली होती आणि त्यापुढील योजना आखली होती. लॉरेन्स बिश्नोई सध्या जोधपूरच्या कारागृहात आहे. तर राहुलवर अनेक हत्यांचे आरोप आहेत.
-------------------------------

Comments

Popular posts from this blog

Lockdown | देशभरात अडकलेल्या लोकांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा; गृह मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी

Coronaupdate | कोरोना महामारीचा सर्वात जास्त धोका हा ज्येष्ठ नागरिकांना आहे. या काळात ज्येष्ठांनी 'काय करावं आणि काय करु नये' यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचं गंभीरपणे पालन होणं आवश्यक आहे. #coronavirus

निपाणी तालुक्यात आज 21 जणांना कोरोनाची लागन.निपाणी शहरात 19 तर ग्रामीण भागात दोन रुग्ण..