Lockdown | देशभरात अडकलेल्या लोकांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा; गृह मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी
देशभरात विविध ठिकाणी अडकलेले मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु आणि प्रवाशांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण, देशांतर्गत वाहतुकीसाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्यात.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशभरात अनेक ठिकाणी लोक अडकलेले आहेत. त्यामध्ये मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु आणि पर्यटकांचा समावेश आहे. या सर्वांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण, गृह मंत्रालयानं ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांना घरी परतण्यासाठी नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अनेदा राज्यात अडकलेल्या लोकांना घरी जाण्यासाठी केंद्राने व्यवस्था करावी, अशी विनंती केली होती. राज्यांच्या मागणीनंतर गृह मंत्रालयानं वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या प्रवासी मजुर, तीर्थक्षेत्रास गेलेल्या लोक, पर्यटकांना तसेच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी नवीन गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. नव्या गाईडलाइन्सनुसार सर्वच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी नोडल अधिकारी नियुक्त करून अकडलेल्या व्यक्तींना परत पाठवण्यासाठी तसेच मुळ ठिकाणी परत आणण्यासाठी एक एसओपीची नियुक्ती करावी लागणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या गाइडलाईन्स
सर्व राज्ये यूटीएसने अशा अडकलेल्या लोकांना परत पाठविण्याकरिता नोडल प्राधिकरण नेमले पाहिजे. प्रमाणित प्रोटोकॉल प्रमाणे प्रक्रिया केली पाहिजे. नोडल अधिकारी देखील त्यांच्या राज्यात/केंद्र शासित प्रदेशात अडकलेल्यांची नोंदणी करतील.
अडकलेल्या लोकांचा गट एका राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशातून दुसर्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात जाण्याची इच्छा असल्यास, पाठविणारे आणि प्राप्त करणारे राज्य एकमेकांशी सल्लामसलत करू शकतात.
परत जाणाऱ्या व्यक्तीची तपासणी केली जाईल आणि जे संशयीत नाहीत त्यांना पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल.
बसेस व्यक्तींच्या गटाच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातील.
बसेस स्वच्छता करुन बसविण्यामध्ये सुरक्षित अंतराच्या निकषांचे पालन करतील.
संक्रमण मार्गावर पडणारी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना अशा व्यक्तींच्या जाण्याची परवानगी देतील.
गंतव्यस्थानावर आगमन झाल्यावर अशा व्यक्तीचे मूल्यांकन स्थानिक आरोग्य अधिकाराच्या व्दारे केले जाईल आणि घरात अलगीकरण केले जाईल. त्यांना नियमितपणे तपासणी करून देखरेखीखाली ठेवण्यात येईल.
अशा व्यक्तीची आरोग्य सेतु अॅपमध्ये नोंदणी करण्यात येईल. ज्याद्वारे त्याच्या आरोग्याच्या स्थितीवर लक्ष ठेवले जाऊ शकते.
Comments
Post a Comment