डीसीसी बँकेकडून राज्यसरकारला एक कोटीचा धनादेश.- अध्यक्ष रमेश कत्ती
डीसीसी बँकेकडून राज्यसरकारला एक कोटीचा धनादेश -: अध्यक्ष रमेश कत्ती
कोरोनामुळे संपूर्ण देश विचलित झाला असून जनतेचे रक्षण करण्यासाठी सरकारला सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. यासंदर्भात बेळगाव येथील डीसीसी बँकेकडून मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीसाठी 1 कोटी रुपये किंमतीचा धनादेश देण्यात येणार आहे. डीसीसी बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार रमेश कत्ती यांनी याबाबत घोषणा केली आहे.
कत्ती म्हणाले की, संपूर्ण देश कोरोनाशी झुंजत आहे. अशा परिस्थितीत अनेकांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहे. त्याचबरोबर आर्थिक बजेट ही कोलमंडला आहे. त्यामुळे राज्य सरकारवर भार पडत आहे. या दृष्टिकोनातून आपण आणि प्रशासकीय मंडळाने 1 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवसेंदिवस या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हे ओळखून सरकारने बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (डीपीसी) कडून कोरोनव्हायरस विरूद्ध लढा देण्यासाठी सरकारची मदत करण्यासाठी एक कोटी रुपये देण्याचे ठरविले आहे.
कोरोनाव्हायरस रोखण्यासाठी लॉकडाउन ही देशात आवश्यक आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने आज देशातील लोकांसाठी एक चांगले स्थान बनवले आहे. नागरिकांनी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. घरी रहावे आणि कुटुंबासह सामाजिक सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment