Posts

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अद्याप निर्णय नाही..- न्यायालयाने 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला आहे निकाल..

Image
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अद्याप निर्णय नाही. . - न्यायालयाने 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला आहे  निकाल.. अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा तिढा अद्याप संपला नाही. विद्यापीठाला यूजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग)च्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भातील निर्देशांविरोधात याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला. आगामी तीन दिवसात सर्व याचिकाकर्त्यांना आपले म्हणणे लेखी स्वरूपात सर्वोच्च न्यायालयात मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्रात सरकारची नकारात्मक भूमिका असतानाही यूजीसीने परीक्षा घेण्याचे आदेश दिले. मात्र राज्य सरकार परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होती. मात्र याबाबत निकाल लागला नाही. महाराष्ट्र सरकारतर्फे वकील अरविंद दातार यांनी युक्तिवाद केला. विद्यार्थी विरुद्ध यूजीसी प्रकरणात ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांनी सरकारची बाजू मांडली. आता महाराष्ट्र फक्त अंतिम परीक्षेसंबंधित वाद आहे. जर ...

कृष्णा- कोयना... सख्या बहिणी.....

Image
कृष्णा- कोयना... सख्या बहिणी. कराडचा प्रितीसंगम म्हणजे निसर्गाची एक कलाकृतीच आहे. उत्तरेहुन वाहत येणारी कृष्णा व दक्षिणेहुन येणारी कोयना दोघी अगदी आमने सामने येवून एकमेकिँना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पुर्वेला वाहत जातात. असे काटकोनात वाहने सहसा नद्यांच्या स्वभावात नाही. पण कराडचा प्रितीसंगम मात्र त्याला अपवाद. तसे म्हंटले तर कृष्णा व कोयना सख्या बहिणीच... महाबळेश्वर हे या दोघीँचे उगमस्थान. पण दोघींमध्ये केवढा फरक, थोरली बहिण कृष्णा समसूतदारपणे वगणारी. ही लहान मुलीसारखी डोँगर- दर्याँमध्ये जास्त खेळत बसत नाही. हिला घाई असते ती घाटांवर यायची, तहानलेल्या पिकांना पाणि पाजून ताजे तवाने करण्याची. तर धाकटी बहीण कोयना म्हणजे खुप खोडकर... डोँगरांमध्ये खेळणे हिला फार आवडते. हिचे सगळे मित्र पण असेच रांगडे... प्रतापगड, मकरंदगड, वासोटा आणि जावळीचे खोरे म्हणजे यांचे आंगण, पण धाकटी असली तरी आंगात जोर फार... पूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवते. तर अश्या या दोघी. अगदी भिन्न स्वभावाच्या पण सख्या बहिणी. जबाबदारीने वागणारी कृष्णा तर खोडकर कोयना. उस शेती पिकवणारी कृष्णा, तर भात पिकव...

महाराष्ट्र राज्यात आजी-माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करातून माफी,ग्रामविकास विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

Image
आजी-माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करातून माफी,ग्रामविकास विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय . राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागामार्फत निर्गमित करण्यात आला असून देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राज्यातील सर्व आजी-माजी सैनिकांसाठी हा निर्णय लागू करण्यात येत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. ग्रामीण क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या अनेक आजी, माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून निःस्वार्थपणे देशाचे संरक्षण केले आहे. त्यांची देशसेवा विचारात घेता सर्व आजी, माजी सैनिकांना भावनिक दिलासा देणे व त्यांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्याच्या अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतला असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. अशा करमाफीस पात्र ठरणाच्या व्यक्तींनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

सलमानला मारण्यासाठी शार्प शूटर आला होता मुंबईत; पोलिसांनी केली अटक

Image
सलमानला मारण्यासाठी शार्प शूटर आला होता मुंबईत; पोलिसांनी केली अटक .. 👉अभिनेता सलमान खानच्या हत्येसाठी रेकी करणाऱ्या गुन्हेगाराला क्राइम ब्रांचने अटक केली आहे. या गुन्हेगाराचं नाव राहुल असून क्राइम ब्रांचने १५ ऑगस्ट रोजी उत्तराखंडमध्ये त्याला अटक केली. अटक केल्यानंतर चौकशीत राहुलने अनेक आरोपांचे खुलासे केले. 👉आरोपी राहुल उर्फ सांगा याने जानेवारी महिन्यात मुंबईत येऊन सलमानच्या घराची रेकी केली होती, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. सलमान घरातून किती वाजता बाहेर पडतो, त्याची दिनचर्या कशी असते याबाबत त्याने माहिती मिळवली होती. कुख्यात लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची जबाबदारी राहुलला दिली होती.  👉लॉरेन्स बिश्नोई हा हरयाणा, पंजाब आणि राजस्थानचा कुख्यात गँगस्टर असून त्यानेच सलमानच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.राहुल हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचा शार्प शूटर आहे. लॉरेन्सच्या सांगण्यावरून त्याने सलमानची रेकी केली होती आणि त्यापुढील योजना आखली होती. लॉरेन्स बिश्नोई सध्या जोधपूरच्या कारागृहात आहे. तर राहुलवर अनेक हत्यांच...

स्वतःला आत्मनिर्भर, कणखर आणि शक्तिशाली बनवायचं असेल तर...

Image
स्वतःला आत्मनिर्भर, कणखर आणि शक्तिशाली बनवायचं असेल तर  अभ्यासाबरोबरच महत्वकांक्षा, परिश्रम आणि प्रयत्न आवश्यक आहेत......हे लिहिण्याचं कारण म्हणजे छायाचित्रातील ही स्वप्नाली सुतार.कणकवली तालुक्यातील दुर्गम अशा दारीस्ते गावातील ही युवती. अभ्यासात भयंकर हुशार....दहावीत 98 टक्के तर बारावीत कॉलेज मध्ये प्रथम आलेली.डॉक्टर व्हायची इच्छा.... पण परिस्थिती आडवी आली.आई वडील शेतकरी,एवढा खर्च पेलवणारा नव्हता.म्हणून मुंबईला पशु वैद्यकीय अधिकारी होण्याचं शिक्षण घेत होती.लॉकडाऊन मध्ये गावात अडकली.... आणि तिकडे ऑनलाइन लेक्चर सुरू झाले.गावातील घराकडे फोन येण्याचं नेटवर्क मिळताना मारामारी तिथे इंटरनेट कुठून असणार..?परत अँड्रॉइड मोबाईलचा ही प्रश्न होताच.मोठ्या भावाने आपला मोबाईल दिला.....त्याचा मोबाईल घेऊन कुठे नेट मिळते यासाठी फिरत असताना डोंगरात नेट मिळालं.उन्हाळयात दिवसभर डोंगरावर झाडाखाली उभं राहून शिक्षण घेत होती.सकाळी 7 ला घरातून जाते ती सायंकाळी 7 च्या आसपास येते.अख्खा दिवस डोंगरातील त्या झोपडीतच जातो.....पुन्हा प्रॉब्लेम आला तो चार्जिंगचा.कुठल्यातरी मॅडमनी पॉवर बँक दिली.पावसाळा सु...

निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा.

Image
निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. लवासा पुढील महिन्यात फिलिपाईन्सस्थित एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (एडीबी) उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. लवासा हे 1980 च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी होते. मुख्य निवडणूक आयुक्त होण्याचे ते दावेदार होते. त्यांचा निवडणूक आयोगाचा कार्यकाळ अद्याप बाकी होता. 23 जानेवारी 2018 रोजी त्यांनी भारताच्या निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. ऑक्टोबर 2022 मध्ये ते मुख्य निवडणूक आयुक्तपदावरून सेवानिवृत्त होणार होते. मात्र, आता ते एडीबीचे उपाध्यक्षपद भूषवतील.  एशियन डेव्हलपमेंट बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, एडीबीने अशोक लवासा यांची खासगी क्षेत्रातील कामकाजासाठी आणि सार्वजनिक खासगी भागीदारीसाठी बँकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. दिवाकर गुप्ता यांची जागा ते घेतील. गुप्ता यांचा कार्यकाळ 31 ऑगस्टपर्यंत आहे.  निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होण्यापूर्वी लवासा केंद्रीय अर्थ सचिव म्हणून निवृत्त झाले. यापूर्वी ते पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे केंद्रीय सचिवही ह...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह ..

Image
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. शरद पवार यांची मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तपासणी केली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शरद पवार सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत. पवारांचा स्टाफ ज्या ठिकाणी राहतो, तिथेही चाचणी करत आहोत. त्यांची काळजी घेतली जात आहे. प्रोटोकॉलनुसार सगळ्या गोष्टी पाळल्या जात आहेत, असं राजेश टोपे म्हणाले. शरद पवार सातत्याने राज्यभर दौरा करत आहेत. मात्र सध्या राज्यात न फिरण्याची विनंती करणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, “शरद पवार महाराष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. काळजी घ्यावी असं आम्ही कायमच सांगत असतो. परंतु त्यांचा उत्साह, लोकांप्रति बांधिलकी किंवा दौऱ्यातून कदाचित संदेश द्यायचे असतात. ते स्वत:ही काळजी घेत आहेत, चिंता करण्याची काही गोष्ट नाही,” असं राजेश टोपे म्हणाले.